⁠ 
रविवार, मे 19, 2024

खुशखबर.. सोन्याच्या भावात मोठी घसरण, यावर्षीच्या विक्रमी उच्चांकापेक्षा 5000 रुपयाने स्वस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । उद्या म्हणजेच शनिवार (२२ ऑक्टोबर) पासून दिवाळी (Diwali 2022) सणाला सुरुवात होत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी (Gold and Silver) ग्राहक सराफा बाजाराकडे वळत आहे. अशात तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबत आहे. ती म्हणजे आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. यावर्षीच्या विक्रमी उच्चांकापेक्षा सोने 5000 रुपयांपेक्षा अधिकने स्वस्त झाले आहे. Gold Silver Price Today

MCX वर आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
आज शुक्रवारी , 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रति 10 ग्रॅम सोने 261 रुपयांनी घसरले. त्यामुळे सोने 49,882 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे सुरुवातीच्या व्यवहारात आज चांदी किमतीतही मोठी घसरण झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत चांदी 500 रुपयांनी घसरून 56,154 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

विक्रमी उच्चांकापेक्षा सोने 5000 रुपयांपेक्षा अधिकने स्वस्त
या वर्षी मार्चमध्ये सोन्याचा भाव 55,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता. आज झालेल्या घसरणीनंतर सोने 50 हजाराखाली आले आहे. म्हणजेच यंदाच्या विक्रमी उच्चांकापेक्षा यावेळी सोने सुमारे 5000 रुपयांहुन अधिकने स्वस्त आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,300 रुपयांपर्यंत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,600 रुपये इतका आहे. दरम्यान, दुसरीकडे सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 56,300 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
तुम्ही घरबसल्या बीआयएस केअर अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता. सोन्याचा परवाना क्रमांक, हॉलमार्क किंवा नोंदणी क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही थेट सरकारकडे तक्रार करू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी काय कारवाई केली, याचीही माहिती मिळेल.