⁠ 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | युवासेनेच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत साई मोरया ग्रुप विजयी

युवासेनेच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत साई मोरया ग्रुप विजयी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । युवासेनेच्या 12 व्या वर्धापन दिवसानिमित्त युवासेना जळगाव तर्फे विधानसभा युवाधिकारी अमित जगताप व जळगाव लोकसभा कॉलेज कक्ष अधिकारी प्रितम शिंदे यांच्या पुढाकाराने बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७.३० ते १०.३० वाजे दरम्यान यु.एस.टर्फ मोहाडी रोड जळगाव येथे करण्यात आले होते.

या मध्ये ५ संघ सहभागी झाले होते. खोटेनगर येथील साई मोरया ग्रुप हा संघ विजयी ठरला. प्रत्येक संघात ८ खेळाडूंचा सहभाग होता. विजेत्या संघाचे कर्णधार उमाकांत जाधव यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पियुष हसवाल व उत्कृष्ट फलंदाज म्हणून गिरीश वंजारी यांना सन्मानित करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, ज्येष्ठ विधितज्ज्ञ सत्यजित पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, लोकेश पाटील, भूषण सोनवणे, शुभम पुचा आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह