दिवाळी, छठला घरी जाण्यासाठी मिळेल कन्फॉर्म तिकीट ; भुसावळ विभागातून धावणार विशेष ट्रेन
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । सणासुदीचा हंगाम सुरू आहे. काही दिवसांवरच दिवाळी, छठ असे मोठे सण आहेत. इतर शहरांमध्ये काम करणारे लाखो लोक या सणांना आपापल्या घरी जातात. अशा परिस्थितीत रेल्वे तिकीट मिळणे कठीण होते. दरम्यान, अशातच रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने सणासुदीच्या काळात स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात अनेक गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत.
सणांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेने ऑक्टोबरमध्ये 15 हून अधिक सणासुदीच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यूपी-बिहारमधील लोकांना या ट्रेन्सचा विशेष फायदा होणार आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांना त्यांची जागा सहज बुक करता येणार आहे. जर तुम्हाला दिवाळी आणि छठमध्ये घरी जायचे असेल आणि सामान्य धावत्या गाड्यांमध्ये जागा भरल्या असतील तर तुम्ही या विशेष गाड्यांमध्येही तिकीट बुक करू शकता.
भुसावळ विभागातून धावणार या गाड्या
दादर – बलिया आठवड्यातून 3 दिवस (01025) दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार धावणार. ही गाडी 03.10.22 ते 31.10.22 पर्यंत धावेल. या गाडीला एसी 2 टियर, 3 टियर, स्लीपर आणि जनरल क्लास असे कोच राहतील. तसेच ही गाडी कल्याण, नाशिक, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमला पती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगपूर, महाराजा छत्रसाल, खजुराहो, महोबा, बोंडा, चित्रकुटधाम, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर रोड, वाराणसी, ऊनिहार, मऊ, रसरा या स्टेशनवर थांबेल.
बलिया-दादर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी ०५.१०२२ ते ३१.१०.२२ पर्यंत आठवड्यातून ३ दिवस (०१०२६) धावेल. या गाडीला एसी २ टायर, ३ टायर, स्लीपर आणि जनरल क्लासेसमध्ये असतील.
दादर-गोरखपूर विशेष आठवड्यात (01027) ही गाडी दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी 01.10.22 ते 30.10.22 पर्यंत धावेल. या गाडीला AC 2 टियर, 3 टियर, स्लीपर आणि जनरल क्लास राहतील. तसेच ही गाडी नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमला पती , ललितपूर, टिकमगड, खरगपूर, महाराजा छत्रसाल, खजुराहो, महोबा, बोंडा, चित्रकुटधाम, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर रोड, वाराणसी, औनिहार, मऊ, भटनी, देवरिया या स्टेशनावर थांबेल. तर गोरखपूर-दादर (01028) ही गाडी आठवड्यातून चार दिवस धावेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर सुपर फास्ट साप्ताहिक (02105) 19/10 आणि 26/10.22 पर्यंत दर बुधवारी धावेल. या गाडीला फर्स्ट क्लास एसी, एसी 2 टायर, 3 टायर, स्लीपर आणि जनरल क्लास असे कोच राहतील. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, राणी कमला पती, बिना, झांसी, ओराई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर रोड, बनारस, वाराणसी, ऊनिहार, मऊ, बेलथरा रोड, भटनी, देवरिया स्टेशनावर थांबेल
गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर फास्ट साप्ताहिक (02106)21/10 आणि 28/10 दर शुक्रवारी प्रथम धावेल.
तर दुसरीकडे मध्य रेल्वेने मुंबई-मनमाड, नागपूर-मडगाव या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस-मनमाड अति जलद विशेष, मनमाड-लोकमान्य टिळक टर्मिनस अति जलद विशेष गाडी ५ जानेवारीपर्यंत, लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्हारशाह विशेष (मंगळवार) ही विशेष गाडी ३ जानेवारीपर्यंत, बल्हारशाह-एलटीटी विशेष (बुधवार) ४ जानेवारीपर्यंत चालवण्यासाठी वाढवण्यात आली.