⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 29, 2024
Home | निधन वार्ता | यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

यूपीचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे आज सोमवारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. मुलायम यांना आजारपणामुळे गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवपासून त्यांच्यावर उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. Mulayam Singh Yadav passed away

दरम्यान, त्यांच्या निधनाने राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलायम सिंह यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे बंधू राम गोपाल यादव यांच्याशी फोनवर बोलून शोक व्यक्त केला.

मुलायम सिंह यांचा अल्पपरिचय
22 नोव्हेंबर 1939 मध्ये उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात जन्म झाला होता. उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यादव यांची नेताजी म्हणून ओळख होती. 1967 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार बनले. 1992मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली होती. 3 वेळी त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. 1996 ते 1998 दरम्यान केंद्रीय संरक्षणमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली होती. मागच्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर प्रदेशच्या मेनुपुरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केलं दुःख
मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणातही स्वतःला सिद्ध केलं होतं. आणीबाणीच्या काळात ते एक महत्त्वाचे सैनिक असल्यासारखे होते, असं नरेंद्र मोही यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाने भारताला अधिक बळकटी दिली, असंही मोदी म्हणाले. राष्ट्रहितासाठी मुलायम सिंह यादव यांनी नेहमी संसदेत महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटलं. ट्वीट करुन मोदींनी मुलायम सिंह यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलंय.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.