जळगाव शहरराजकारण

दसरा मेळाव्यातील गर्दीवर गुलाबराव पाटील म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेला (Shiv Sena) मोठा धक्का बसलाय. यानंतर नुकतेच पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. पहिले म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवतीर्थ तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बीकेसी मैदान मेळावा पार पडला. मात्र या मेळाव्यांनंतर कोणी किती गर्दी जमवली यावरुन आता राजकीय चर्चा सुरू आहेत. अशातच शिंदे गटाचे सदस्य आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दोन मेळावे असले तरी आमच्या मेळाव्यात आम्हाला अपेक्षित असलेल्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी आली. हिंदुत्वाचा विचार आणि शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेला पवित्रा लोकांना मान्य असल्यानेच आम्हाला ही पावती मिळाली, असा दावा गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की ‘मी उद्धव ठाकरेंच्या 35 वर्षे जवळ राहिलो आहे, पण त्यांना कधीही बोलताना घसरलेलं पाहिलं नाही. दीड वर्षांच्या मुलावर ते टीका करतात, राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये’, असं म्हणत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button