⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

जळगावच्या आरटीओ पदी कोल्हापूरचे दीपक पाटील यांची नियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । तीन महिने लोटले गेल्यावर प्रथमच प्रादेशिक परिवहन विभागाला नवीन आरटीओ अधिकारी मिळाले आहेत. प्रादेशिक परिवहन विभाग जळगावचा दर्जा मिळाल्यानंतर हे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. कोल्हापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची पदोन्नतीवर जळगाव आरटीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांचा कार्यकाळ नगर, बारामती येथे विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे.

राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी गुरुवारी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेश काढले होते. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे कार्यरत असलेले दीपक पाटील यांना कोल्हापूर येथून कार्यमुक्त होऊन जळगाव आरटीओ पदाचा कारभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोणी यांच्या बढती व बदलीचे आदेश अद्यापही प्राप्त झालेले नाहीत.

कोण आहे दीपक पाटील :
दीपक पाटील यापूर्वी नंदुरबार नगर, बारामती, व सध्या ते कोल्हापूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. 2010 ते 2012 नगर येथील कार्यकाळात बिना क्रमांकची चार चाकी चालवून जातील ते चर्चेत आले. वाहनांचा 63.76 लाख रुपयांचा सेवा कर गोळा करून शासकीय तिजोरीत न भरल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे चौकशी झाली आहे.