दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हलकडून प्रवाशांची होणारी लुटमार थांबवा!
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । विविध सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर विशेष करून येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हल्स कडून जी भरमसाठ भाडेवाढ करून सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक केली जाते, ती थांबावी आणि अशाप्रकारे जनतेला लुटणाऱ्या ट्रॅव्हल्स वर कारवाई व्हावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत सुराज्य अभियानाच्या वतीने जळगाव जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, या निवेदनाची दखल घेत लोही यांनी लगेच याविषयी प्रसिध्दी पत्रक काढले आणि एक दर पत्रक निश्चित दरपत्रक काढून ते सर्वत्र तिकीट काऊंटर च्या येथे दिसेल असे लावण्यास सांगितले आहे. तसेच ज्यांचे दर अधिक आहेत त्यांना लगेच नोटीस पाठवण्याचे आदेशही देण्यात आल्याचे लोही यांनी सांगितले. यावेळी समितीचे प्रशांत जुवेकर, दुर्गा प्रसाद पाटील आणि राहुल घुगे उपस्थित होते.