जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । केंद्रातील मोठी सरकार लोकसभा आणि राज्यसभेच्या स्टँडिंग कमिटींची पुर्नरचना करण्याची शक्यता आहे. ज्या स्थायी समित्यांवर काँग्रेस नेते अध्यक्ष आहेत, त्या समित्या काँग्रेसच्या ताब्यातून जाणार आहेत.असे म्हटले जात आहे. त्यातील एका महत्वाच्या समितीवर शिंदे गटाच्या खासदाराची वर्णी लागणार असल्याच्या चर्चा आहेत.
कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी साठीच्या समितीवर शशी थरुर अध्यक्ष आहेत. त्यांची ही जागा मित्र पक्ष शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे खासदारांना हे पद मिळू शकते. प्रतापराव जाधव महाराष्ट्रातील बुलढाण्याचे खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात ते इतर खासदारांसोबत शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यांना हे पद मिळू शकते असे म्हटले जात आहे.
त्यांचे नाव जरी पुढे आलेले असले तरी कार्ती चिदंबरम, जॉन ब्रिटास या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून आयटी पॅनलच्या अध्यक्षपदी थरुर यांचा कार्यकाळ वाढवावा, अशी मागणी केली आहे. २०१९ मध्ये थरुर यांची बिर्ला यांनी नियुक्ती केली होती.