जळगाव शहर
वर्ल्ड पावरलिफ्टिंग इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावच्या अंशिता गायकवाडला सुवर्णपदक
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । गुवाहाटी आसाम येथे ‘नॅशनल वर्ल्ड पावर लिफ्टिंग इंडिया चॅम्पियनशिप’ स्पर्धा नुकतीच पार पडली. यात अंशिता गायकवाड हिला सुवर्ण पदक मिळाले. विशेष म्हणजे, पुढील होणाऱ्या इंटरनॅशनल (आंतरराष्ट्रीय ) पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप साठी तिची निवड झाली आहे.
ओम अकॅडमी चे संचालक संजय काळे व नंदलाल पारधी यांनी या प्रसंगी अंशिता चा सत्कार करून तीचे कौतुक केले. अंशिता ही विटनेर येथिल प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गायकवाड व शिवअस्तित्व सेवा फाउंडेशन च्या अध्यक्षा सविता साठे गायकवाड यांची कन्या आहे. तीने जळगाव जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर नेले अंशिता च्या या उत्कृष्ट कामगिरी ने सर्व स्तरातून तीचे कौतुक होत आहे.