जळगाव शहर
संत नामदेव महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी!
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । संत नामदेव महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. 4 नोव्हेंबर रोजी संत नामदेव महाराजांच्या 752 जयंती सोहळा साजरा होणार आहे. इतर संताच्या जयंती सोहळा हा शासकीय स्तरावर साजरा करण्याच्या निर्णया प्रमाणे संत नामदेव महाराजांची जयंती देखील शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आ.भोळे यांनी निवेदनाद्वारे केली.
संत नामदेव महाराज बहुउदेशिय संस्था, श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव व वारकरी संप्रदाय तर्फे आमदार सुरेश भोळे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहे.