⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | रोजगार सेवकाचा शासकीय योजनांमध्ये झोल!

रोजगार सेवकाचा शासकीय योजनांमध्ये झोल!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktaingar News-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील रोजगार सेवकाने स्वतः कुटुंबात घरकुल, विहिर, गोठा, फळबाग लागवड या रोजगार हमी योजनेतील विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभ घेवून घोटाळा केल्याची तक्रार सारोळा येथील नागरकांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुक्ताईनगर व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद जळगाव यांच्याकडे केली आहे. याबाबत मस्टरवरील ऑनलाईन नोंद असलेले पुरावेच सादर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

लेखी तक्रार करणार्‍यांमध्ये रमेश दिनकर सावळे, कैलास नामदेव वाघ, विकी प्रभाकर चौधरी, ज्ञानेश्वर वसंत जगताप, महेंद्र रमेश गवळी, अनिल रामराव काटे, भास्कर राजाराम गवळी, कैलास पुंडलिक जगताप, रामसिंग उत्तम गोपाळ, संजय राघोजी कोळी, अशोक नामदेव पाटील, विक्रम पांडुरंग गवळी, देविदास जगन्नाथ कोळी, रतन भिलाजी कोळी (सर्व रा.सारोळा) यांचा समावेश आहे.

मौजे सारोळा येथील रोजगार सेवकाने घरकुल विहिर, गोठा फळबाग लागवड योजना या रोजगार हमी अंतर्गत येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये पात्र लाभार्थी नागरीकांना डावलून त्यांच्या हक्काच्या शासनाद्वारे जाहीर झालेल्या योजनांमध्ये स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना योजनेसाठी पात्र नसताना लाभ दिल्याचा आरोप आहे. मस्टरवर सादर झालेल्या नमूद नावानिशी अदा केलेल्या बिलांच्या ऑनलाईन नोंदी तक्रारीसोबत जोडण्यात आल्या आहेत. रोजगार सेवकाने शासनाच्या नियमांची पायमल्ली करून महा घोटाळा केल्याची तक्रार करण्यात आली असून याबाबत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह