जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआयने महाजनांवर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही असं सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले कि, मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला हस्तांतरीत केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, सीबीआयने गिरीश महाजनांवर कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाहीये. मागच्या काळात सीआयडीकडे जो गुन्हा दाखल झाला होता तो आम्ही सीबीआयला केवळ हस्तांतरीत केला आहे. त्याच प्रकरणात मी एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्या पेन ड्राईव्हमध्ये कशाप्रकारे खोट्या केसेस दाखल करायच्या याचा खुलासा केला होता. तसेच यामागे कोण आहेत तेही समोर आलं होतं.
“हे सगळं प्रकरण आता सीबीआयकडे गेलं आहे. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र असेल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र असेल या सर्व गोष्टींचा पेन ड्राईव्हच्या माध्यमातून खुलासा झाला होता. आता त्याची चौकशी सीबीआय करते आहे,