वाणिज्य

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त ; उच्चांकी दरापेक्षा सोनं 5700 ने स्वस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान, आज नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. अशातच आज पहिल्याच दिवस सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. सोबतच चांदीच्या भावात देखील मोठी घसरण दिसून येतेय. जळगावमध्ये उच्चांकी दरापेक्षा सोनं जवळपास साडे पाच हजार रुपयांहून अधिकने स्वस्त झाल आहे. Gold Silver Rate Today

MCX वर आजचा सोन्याच्या भाव :
आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सकाळी 10 वाजता MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 20 रुपयांनी घसरले असून 49,384 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत आहे. आज फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा व्यवहार 49,350 रुपयांच्या पातळीवरून सुरू झाला. काही वेळाने किंमत 49,440 रुपयांवर पोहोचली. नंतर त्यात घसरण झाली. तर दुसरीकडे आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. चांदीचा दर आज 669 रुपयांनी घसरून 55,564 रुपये प्रतिकिलो झाला.

जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजरात सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 45,258 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,500 रुपये इतका आहे. यापूर्वी गेल्या सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,600, मंगळवारी 50,550, बुधवारी 50,600, गुरुवारी 50,500, शुक्रवारी 50,700, शनिवारी 50,100 असा होता. दरम्यान, दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 56,800 रुपये इतका आहे. तो यापूर्वी 58,700 रुपये आहे. तसेच गेल्या आठवड्यात 57,000 रुपये इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने सध्या त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा ५७०० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की, ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव ५६२०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

वास्तविक, आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत आहे. आज नवीन व्यावसायिक आठवड्याचा पहिला दिवस आहे. याआधी सराफा बाजारात सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही नरमाई दिसून आली. अशा परिस्थितीत आज नव्या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची वाटचाल कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button