⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | सोन्याच्या घसरणीला ब्रेक, दरात झाली वाढ ; वाचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

सोन्याच्या घसरणीला ब्रेक, दरात झाली वाढ ; वाचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । सलग तीन दिवस झालेल्या घसरणीनंतर व्यवहाराच्या चौथ्या दिवशी सोने महागले आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज(MCX) वर सोन्याच्या भावात वाढ दिसून आलीय. तर दुसरीकडे चांदीच्या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात किंचित घसरण दिसून आलीय. Gold Silver Rate Today

आजचा MCX वरील भाव:
गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 24 कॅरेट शुद्धतेचे MCX सोने 40 रुपयांनी वाढून 49,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत किंचित 10 रुपयाची घसरण झाली असून प्रति किलोचा दर 57,279 रुपयावर व्यवहार करत आहे.

जळगावमधील दर
दरम्यान, जळगावमध्ये सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,260 रुपये इतका आहे. जो पूर्वी 46,350 रुपायांवर होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,500 रुपये इतका आहे. जो पूर्वी 50,600 रुपयावर होता. तर सध्या चांदीचा एक किलोचा भाव जवळपास 57,800 रुपये इतका आहे. तो पूर्वी 57,500 रुपयावर होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.