चहावाल्याची गांधीगिरी, खड्ड्यात लावले रोपटे!
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे प्रतापनगर येथील एका चहावाल्याच्या डोळ्यादेखत काही नागरिकांचे अपघात झाले. यामुळे त्याने त्या खड्ड्यात वृक्षारोपण केले.जेणेकरून नागरिकनांचे अजून अपघात हेऊ नये.
जळगाव शहरामध्ये समस्यांची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे आता जळगाव शहरातील नागरिकांना देखील या समस्यांची सवय झाली आहे. यातच आता याविरुद्ध आवाज उठवायला जळगाव शहरातील नागरिकांनी सुरुवात केली आहे. जळगाव शहरातील ‘चेतन’ या चहा विक्री करणाऱ्या तरुणाने खड्ड्यामध्ये झाड लावून आपला संताप व्यक्त केला.
‘जळगाव लाईव्ह’शी बातचीत करताना चेतन म्हणाला की, जळगाव शहरामध्ये खूप खड्डे पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी हा खड्डा आहे, हा खड्डा गेल्या सहा महिन्यापासून बुजवण्यात आलेला नाही. या खड्ड्यामुळे गेल्या दोन दिवसात चार जणांचा अपघात झाला. ज्यात महिलेचा समावेश होता. एक जळगावकर म्हणून वाईट वाटलं म्हणून मी हा उपक्रम राबवला आहे.
याचबरोबर, तिथे इतर नागरिक देखील उपस्थित होते. मुस्ताक बागवान यांनी सांगितले की, हा जो उपक्रम आहे याबद्दल चेतनचे अभिनंदन. जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अशावेळी या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कष्ट होत आहेत. या नागरिकांची काळजी कोणालाच वाटत आहे. लवकरात लवकर शहरातल्या रस्ते सुधारतील अशी अपेक्षा आहे.