⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | खुशखबर.. सणासुदीत जळगावात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, वाचा प्रति तोळ्याचा दर

खुशखबर.. सणासुदीत जळगावात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, वाचा प्रति तोळ्याचा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । सध्या देशात सणासुदीला सुरुवात झाली असून अशात तुम्ही जर सोने (Gold Price) खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सुवर्णनगरी जळगावच्या सुवर्ण बाजारात मागील काही दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण झालेली दिसून येतेय. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 51 हजाराखाली आलेला आहे. मात्र दुसरीकडे चांदीचा (Silver Price) दर वधारलेला दिसतोय. दरम्यान, MCX वर आज पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली दिसून येतेय.

MCX वरील आजचा सोने आणि चांदीचा भाव?
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आज गुरुवारी, MCX वर 24 कॅरेट सोने जवळपास दोन महिन्यांनंतर 50,000 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या खाली आले आहे. आज सकाळी MCX 10 वाजेपर्यंत सोने 271 रुपयांनी घसरून 49,747 रुपये प्रति दहा ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 152 रुपयांनी घसरून 56,834 रुपयावर व्यवहार करतोय. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजारात मागील काही सत्रात सोन्याच्या भावात घसरण दिसून आलीय. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,500 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,700 रुपये इतका आहे. यापूर्वी आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सोने 51,400 तर मंगळवारी 51,150 रुपये तर बुधवारी 51,200 रुपये इतका आहे. म्हणजेच गेल्या तीन ते चार दिवसात सोने जवळपास 700 ते 750 रुपयांनी घसरले आहे. तर आज चांदीचा प्रति किलोचा दर जवळपास 57,000 हजाराच्या आसपास आहे. यापूर्वी चांदी सोमवारी 56,500 रुपयांवर, मंगळवारी 56,650 रुपये तर बुधवारी 57,800 इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, देशात सणासुदीला सुरुवात झाली असून अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढते. मात्र, दिवाळीपर्यंत सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता अल्पावधीत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.


author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.