⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | गावठी पिस्तूल बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गावठी पिस्तूल बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून आता पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी गावठी पिस्तोल बाळगणाऱ्या संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया रा. शिंगनुर पो बेहरामपुरा जि. खरगोन असे संशयित आरोपीचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात मोबाईल चोरीचे प्रकार वाढल्याने डॉ. प्रविण मुंडे पोलीस अधीक्षक, जळगाव व चंद्रकांत गवळी अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, डॉ. कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर उपविभाग, फैजपूर यांनी किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले. किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया रा. शिंगनुर पो बेहरामपुरा जि. खरगोन हा इसम होंडा शाईन मोटार सायकल क्र.MP-१०/NG ०९४० या मोटार सायकलने चोपडा ते रावेर कडे जात असुन त्याचे कडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ /सुनिल पंडीत दामोदर, पोहेकॉ / दिपक शांताराम पाटील, पोना/ नंदलाल दशरथ पाटील, पोना/किरण धनगर, पोना/ प्रमोद लाडवंजारी, पोना / भगवान तुकाराम पाटील, चापोहेकॉ भारत पाटील यांचे पथक तयार करुन रवाना केले. यावल पोलीस स्टेशन हद्दीत चोपडा- रावेर रोडवर किनगाव गावाचे पुढे थांबुन येणान्या जाणाऱ्या मोटार सायकली चेक करीत असताना दि. १२/०९/२०२२ रोजी १६.१५ वाजता वरनमुद मोटार सायकलवर वरील वर्णनाचा इसम मिळून आला असता त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कडेस ३०,०००/- रुपयाचा एक गावठी पिस्तोल मिळून आल्याने त्याचे कडून सदरचा गावटी पिस्तोल व त्याचे ताब्यातील ४०,०००/- रु. मोटार सायकल असे जप्त करण्यात आले आहे. आरोपी गोलुसिंग दिलीपसिंग भाटीया वय २८ रा. शिंगनुर पो. बेहरामपुरा जि. खरगौन (मध्यप्रदेश) यास यावल पो.स्टे.ला हजर करून यावल पोलीस स्टेशन फिर्याद दिली असता यावल पो.स्टे. CCTNS नं. ४३२ / २०२२ भारतीय हत्यार अधिनियम क. ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह