⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | नोकरी संधी | महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 7वी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी.. तब्बल 47,000 रुपये पगार मिळेल

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 7वी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी.. तब्बल 47,000 रुपये पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज ।नोकरी संदर्भ । 7वी ते 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आलीय. कंटोनमेंट बोर्ड कामठी नागपूर येथे काही पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावा. अर्ज पोहोचण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे. Cantonment Board Kamptee Nagpur

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
शिपाई (Peon) आणि सफाईवाला (Safaiwala) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

आवश्यक पात्रता काय आहे?
शिपाई पदासाठी उमेदवारांने 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सफाईवाला या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 7th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार :
शिपाई (Peon) – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना
सफाईवाला (Safaiwala) – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्यासाठीचा पत्ता :
मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, बंगला क्रमांक 40, टेम्पल रोड, कॅम्पटी कॅन्टोन्मेंट, जिल्हा – नागपूर, राज्य – महाराष्ट्र पिन 441001.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.