जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । आजची बचत भविष्यात कामी येऊ शकते. अशातच जर तुम्ही भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्या काही येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबाबत सांगणार आहोत.ज्यातून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना आपल्या ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. सध्या म्युच्युअल फंडाचे युग असून त्यात बरेच जण गुंतवणूक करताय. परंतु म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे धोकादायक आहे आणि पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे.
दर ३ महिन्यांनी व्याज दिले जाईल
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना ही एक लहान बचत योजना आहे. तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता. तुम्ही यामध्ये १, २ वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी तुम्हाला व्याज मिळेल. पोस्ट ऑफिसद्वारे दर तिमाहीत तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाईल.
व्याज दर काय आहे
या योजनेवर ५.८ टक्के दराने व्याज मिळेल. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी आपल्या बचत योजनेचे दर निश्चित करते. या योजनेत दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही लाखो जमा करू शकता. या योजनेद्वारे तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. जर तुम्ही या योजनेत 12 हप्ते जमा केले तर या आधारावर तुम्ही बँकांकडून कर्ज घेऊ शकता. तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळेल.
16 लाख कसे मिळतील?
तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये दर महिन्याला 10,000 रुपये गुंतवल्यास 10 वर्षांनंतर तुम्हाला 16 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. तुम्ही 10 वर्षात 12 लाख रुपयांची गुंतवणूक कराल. योजनेचा कार्यकाळ संपल्यावर, तुम्हाला परतावा म्हणून 4,26,476 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला 10 वर्षांनंतर एकूण 16,26,476 रुपये मिळतील.