जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | अमळनेर तालुक्यातील एका गावात जुन्या वादातून दोन महिलांना जिवंत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घडलेली ही घटना प्रचंड धक्कादायक आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये नऊ जणांविरुद्ध विनयभंगासह ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शनिवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादीची वहिनी गावातील सार्वजनिक नळावर धुणे धुण्यासाठी गेली होती. यावेळी परत येताना विनोद पवार याने तिला अडून आमच्या विरुद्ध केलेल्या केसेस मागे घ्या नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याचबरोबर शरद पवार यांने महिलेचा विनयभंग केला. नंतर विनोद सुकदेव पवार, नितीन उखा पवार, रुपाबाई उखा पवार, शरद उखा पवार, उखा बुधा पवार, विमलबाई उखा पवार, रतीलाल रामलाल पाटील, हर्षल रतीलाल पाटील व प्रमोद रतीलाल पाटील यांचा जमावाने लाकडी, लोखंडी रॉड, पेट्रोलने भरलेल्या बाटलीसह पिडीत महिलेवर हल्ला केला. पिडीतीची आई, वहीणी, यांच्या अंगावर शरद पवार याने बाटलीमधील पेट्रोल टाकले व विनोद सुकदेव पवार याने त्याच्या काडीपेटीने जाळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला
यावेळी इतर लोकांनाही या आरोपींनी धक्काबुक्की व चिमटा बुक्क्यांनी मारहाण केली. यात पीडित महिलेचा भाऊ गंभीर झाला आहे. तसेच सतीश पाटील याला देखील मार लागल्याने दोघांना अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महाराणी करणारा नऊ जणांविरुद्ध अमोल अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर असलेला सतीश पाटील हा बेशुद्ध आहे व त्याची प्रकृती चिंताजनक आहे