जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशिय संस्था तर्फे आज रविवारी शहरातील चित्रा चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
विशेष म्हणजे, दि. ३ ऑगस्ट २०२२ रोजी स्मार्ट इलेक्ट्रिशियन व कॉन्ट्रॅक्टर सेवाभावी बहुउद्देशिय संस्थाची स्थापना झाली. संस्थातर्फे हा पहिलाच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या शिबिराला नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी सुमारे ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान, पुढे असच समाजासाठी जे काही सेवा करता येईल त्यासाठी आमचे संस्था सदैव पुढे राहील असे संस्थापक अध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी सांगितले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मिलिंद शिंपी, उपाध्यक्ष अनील पाटील, इसरार खान, सचिव कल्पेश खैरनार, सुनील भोसले, कल्पेश सोमानी, प्रदीप पाटील, जहांगीर शाह, विनायक अत्तरदे, समीर शाह, जुबेर शेख, राम जेऊरकर, रवींद्र आगळे, शरद पाटील, प्रमोद भोळे, रवींद्र पाटील, रोहिदास बडगुजर उपस्थित होते.