जळगाव शहर

कै.विक्रांत यास श्रद्धांजलीसह आरोपी व पालकांवर कडक कायदेशीर कारवाई करा : मुस्लिम शिष्ट मंडळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । नुकत्याच मेहरुण तलाव जळगाव येथे मोटार रेसिंग मुळे अकरा वर्षीय विक्रांत मिश्रा यास आपला जीव गमवावा लागला व ज्याच्या हलगर्जी पणामुळे जीव गेला तो मुलगाही अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून ज्याच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाला, त्या वाहन मालकाला म्हणजे त्या आरोपी चालकाच्या पालकांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जळगाव शहरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक व बिरादरीच्या प्रमुख मुस्लिम समाजाच्या एका शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक एमआयडीसी प्रतापसिंग शिकारे व तपासणी अधिकारी पीएसआय गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तसेच मृत विक्रांतच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

अपघात घडवून अरेरावी करणाऱ्याचा व अपघाताचा निषेध, डायमंड ग्रुपच्या धरणे आंदोलनातील मागण्यांना पाठींबा व ग्रुप चे अभिनंदन, बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या चालकांवर जरी तो अल्पवयीन असला तरी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अल्पवयीन मुलाला वाहनाचा परवाना नसताना त्यास वाहन देऊन निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल त्याच्या पालकांना अटक करून कायदेशीर कारवाई करणे, आरोपीचे पालक मोहम्मद सलीम शहा यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनास कडाडून विरोध करावा व आमचे निवेदन व डायमंड ग्रुपचे निवेदन दोघांचा उल्लेख जामीन विरोधी अहवालात करण्यात यावा, धरणे आंदोलनाच्या वेळेस नगरसेविका एडवोकेट सुचिता हाडा यांनी मनपा प्रशासनावर केलेल्या गंभीर आरोपाची चौकशी करून प्रशासनाच्या हलगर्जीपणा वा निष्काळजी पणा आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी.

कै.विक्रांत मिश्रा च्या घरी जाऊन सांत्वन
सदरचे शिष्ट मंडळ कै.विक्रांत मिश्रा यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेउन आम्ही संपूर्ण समाज आपल्या दुःखात सहभागी असून आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत अशी शाश्वती दिली.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप सिंग शिकारे व सदर अपघाताचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक गिरासे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद चांद अमीर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेस आय चे महानगर प्रमुख अमजद पठाण, मीर शुक्रल्ला फाउंडेशनचे विश्वस्त मीर नाझीम अली,पटेल बिरादरीचे फहीम पटेल, सिकलगर बिरादरीचे अन्वर खान, युवा मानियार बिरादरीचे मोहसीन युसुफ, मरकजचे मुजाहिद खान आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button