जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता अजून एक महागाईचा चटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
सर्वसामान्यांचा नाश्ता लवकरच महाग होणार असून आता नाश्ता करतानाही नागरिकांना महागाईची आठवण होणार आहे. सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर पोहे खातात मात्र हेच पोहे आता महाग झाल्याने नागरिकांचा नाश्ताही महागणार आहे. म्हस्के पोहे दगडी पोहे पातळ पोहे यासारखे विविध प्रकारचे पोहे महाग झाले आहेत. पोह्यांचे दर तब्बल वीस रुपयांनी महागले आहेत. यामुळे नागरिकांना महागाईचा चटका बसणार आहे.
नागरिक मोठ्या प्रमाणात त्याला पोह्यांना पसंती देत असल्यामुळे वर्षभर पोह्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र सणासुदी होईल पोहे यांपासून विविध प्रकारच्या फरसाण व इतर गोष्टी बनवण्यात येतात यामुळे वर्षभर पोह्यांना जरी मागणी असले तरी च्या काळात मोठ्या प्रमाणावर पोह्यांची मागणी वाढते मात्र सध्या हेच पोहे महाग झाले आहेत.
पोहे हे धाना म्हणजेच साळा पासून बनतात. मध्यप्रदेश छत्तीसगड या ठिकाणी यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे या धानाचे मोठे नुकसान झाले. यामुळे पोह्यांची आवक कमी झाली असून पोह्यांचे दर वाढले आहेत. येत्या काळात पोहे अजून महाग होऊ शकतात असे म्हटले जात आहे.
यंदा बाजारामध्ये पोह्यांचे दर वाढले आहेत. पोहे महाग होण्याचे कारण म्हणजे संपूर्ण भारतभर झालेली अतिवृष्टी. पोहे ज्यापासून बनतात ते पीक छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणी बनत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पोह्याचे भाव वादळे आहेत. दोन महिन्यापूर्वी दगडी पोहे ३६ रुपयाला मिळायचे तर ते आता ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पातळ पोहे 44 रुपये ला मिळायचे जे आता ६० रुपयाला मिळत आहेत. याचबरोबर इतर प्रकारचे पोहे देखील महागडे आहेत.