जळगाव लाईव्ह न्यूज | १ सप्टेंबर २०२२ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सत्ता पडण्याची भीती वाटत आहे म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी आधी मंत्रीमंडळ विस्तार थांबवला आणि आता पालकमंत्री देखील जिल्ह्यांना देत नाहीयेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली. वाढदिवसानिमित्त जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
पुढे ते असेही म्हणाले की एकनाथराव खडसेवर टीका केल्याशिवाय जळगाव मध्ये विरोधकांना नागरिकांचे लक्ष वेधता येत नाही. यामुळे गेल्या 40 वर्षापासून माझ्या विरोधात विरोधात एकत्र झाले आहेत. मात्र ते कितीही एकत्र झाले तरी जळगाव जिल्ह्यातल्या नागरिकांचे प्रेम माझ्याकडे आहे.यामुळे सगळे विरोधक एकत्र आले तरी मला संपवू शकत नाहीत.
राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीच संकट कोसळले आहे या संकटातून शेतकऱ्यांना मुक्त कर; अशी प्रार्थना त्यांनी केली. तर सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली आहे ती मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्तांना सरकारने लवकरात लवकर मदत करावी; अशी विनंती सरकारला करणार आहे.असेही खडसे म्हणाले.