⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | आशादायक : २०२५ पर्यंत ई-कार १५ मिनिटे चार्ज केल्यावर १००० किमी चालणार

आशादायक : २०२५ पर्यंत ई-कार १५ मिनिटे चार्ज केल्यावर १००० किमी चालणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । सध्या संपूर्ण भारतामध्ये एका प्रकारे इलेक्ट्रिक वेहिकलची क्रेझ आली आहे. याच्या मागे दुसरे कोणताही कारण नसून एकच कारण आहे. ते म्हणजे सध्या वाढत असलेले पेट्रोलचे भाव. पेट्रोल परवडणार झालं नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर ई व्हेईकल घेत आहेत.यातच एक आशादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या कारची सर्वप्रथम ५ सप्टेंबर १९९६ ला चाचणी करण्यात आली होती. आज २६ वर्षांनंतरही अमेरिकेसारख्या विकसित देशात फक्त २% कार बॅटरीवर चालतात. त्याचे कारण सध्या बॅटरी महाग आणि कामगिरीही चांगली नाही. पण जर बॅटरीत द्रव पदार्थाऐवजी घनपदार्थाचा इलेक्ट्रोलाइट वापर केला तर स‌र्व समस्या संपतील. किंमत कमी होईल. फक्त १५ मिनिटे चार्ज केल्यावर एक सामान्य कारही १००० किमीपर्यंत चालेल.

मग याला उशीर का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे कारण आहे डेंड्राइट. घनपदार्थात भेगा पडण्यास डेंड्राइट म्हणतात. पण आता लवकरच ही समस्या संपुष्टात येणार आहे. गेल्या २ ऑगस्टलाच कतारच्या सरकारी कंपनीने सॉलिड बॅटरी बनवणाऱ्या क्वांटमस्कॅप या अमेरिकी कंपनीत ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे सीईओ भारतीय वंशाचे जगदीपसिंह हे आहेत. क्वांटमस्कॅपची बॅटरी १७% स्वस्त आहे. विशेष म्हणजे ही बॅटरी पत्त्याच्या
२०२५ पर्यंत ईव्ही कार १५ मिनिटे चार्ज केल्यावर १००० किमीपर्यंत…गड्डीएवढी लहान आहे. तसेच ती सध्याच्या शक्तिशाली बॅटऱ्यांपेक्षा ६ पट शक्तिशालीही आहे.

या कंपनीत स‌र्वात मोठा २०% वाटा पोर्शेचा आहे, तिचे फोक्सवॅगन कंपनीवर ५०.७% नियंत्रण आहे. हीच कंपनी ऑडी, स्कोडा, बेंटली, बुगाटी, लॅम्बोर्गिनी, डुकाटी आणि पोर्शे यांसारख्या कार तयार करते. या कंपनीच्या खासगी गुंतवणूकदारांत बिल गेट्स यांचाही समावेश असल्याची वॉल स्ट्रीटमध्ये चर्चा आहे. जानेवारी २०२२ मध्ये कंपनीने एक चाचणी अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार सॉलिड बॅटरी फक्त १५ मिनिटे चार्ज केल्यास ८०% पर्यंत चार्ज होते. या ८०% चार्जिंगमध्ये १००० किलोमीटरचा प्रवास केला जाऊ शकतो. या बॅटरीची चाचणी ३ टप्प्यांत पूर्ण झाली आहे. सध्या स्मार्टफोन ही जशी सामान्य बाब झाली आहे तसाच प्रकार २०२५ पर्यंत ईव्ही कारबद्दलही होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह