जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । केसीई सोसायटीच्या मू.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने दि. २२ते २७ दरम्यान संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान संस्कृत श्लोकपठण, स्तोत्र पठण, वक्तृत्व, निबंध, शोधनिबंध स्पर्धा घेण्यात आल्यात. शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय संस्कृत समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील 12 शाळा सहभागी झाल्या होत्या. या सप्ताहाचा समारोप आणि संस्कृत दिनानिमित्त दि. २७ शनिवार रोजी सकाळी 10 वाजता डॉ. जयश्री झारे सकळकळे त्यांचे ‘कालिदासाच्या कालिदाच्या साहित्यातील निसर्ग आणि चित्रकला’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी कालिदासाच्या साहित्यातील निसर्गातील विविध दाखले देऊन कालिदासाच्या साहित्यावरील अजरामर चित्रकलाकृती दाखविल्यात.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे होते. साहित्याची कल्पनाविश्व हे उत्तुंग असते असे भाषाप्रशाळेचे संचालक डॉ. भूपेंद्र केसूर यांनी प्रतिपादित केले, यावेळी सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील पारितोषेके प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आलीत. या स्पर्धेत ओरीयन सीबीएसई शाळेला प्रथम क्रमांक, शानबाग विद्यालयाला द्वितीय, ए.टी.झांबरे विद्यालयाला तिसरे आणि केंद्रीय विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपासनी हिने केले, प्रास्ताविक संस्कृत विभाग प्रमुख डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अखिलेश शर्मा यांनी केले.