⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | वाणिज्य | Gold Silver Rate : ‘या’ आठवड्यात सोने-चांदी स्वस्त की महाग? त्वरित जाणून घ्या

Gold Silver Rate : ‘या’ आठवड्यात सोने-चांदी स्वस्त की महाग? त्वरित जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एमसीएक्स बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. त्यामुळे MCX वर सोन्याचा भाव ५१,२३४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आले. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ५४,८१६ रुपयावर आली आहे. Gold Silver Rate Today

दरम्यान, या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या भावात घसरण दिसून आली आहे. सोबतच चांदी देखील घसरली आहे. गेल्या आठवड्यात MCX वर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,५०० रुपये इतका होता. तो या आठवड्यात घसरून ५१,२३४ रुपये इतक्यावर आला. म्हणजेच सोन्याच्या भावात २५० ते ३०० रुपयाचीघसरण झाली आहे.

तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात चांदीचा भाव ५५,९५८ रुपये प्रति किलो इतका होता. तो सध्या ५४,८१६ रुपयावर आला आहे. म्हणजेच गेल्या मागील काही दिवसात चांदी १४० ते १५० रुपायाची घसरण झाली आहे.

जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
जळगावमध्ये मात्र सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून येतेय. गेल्या आठवड्यात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास ५२,३०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७,९१० रुपये इतका आहे. तो या आठवड्यात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,४०० रुपये इतका आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठ्वड्यात चांदीचा भाव ५७००० रुपये प्रति किलो इतका होता. या आठवड्यात ५६,६०० रुपयावर आला आहे. म्हणजेच चांदी जवळपास ११०० रुपयांनी घसरली घसरली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, रेकॉर्ड स्तरापासून सोने ३८०० रुपयांनी घसरले आहे. तर चांदी जवळपास १५००० हजार रुपयांनी घसरले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५६,२०० रुपयावर गेला होता. तर चांदी ७१००० रुपयावर गेली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.