⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | फडणवीसांनंतर आता एकनाथ खडसेंनीही टाकला विधानपरिषदेत पेन ड्राईव्ह बॉम्ब

फडणवीसांनंतर आता एकनाथ खडसेंनीही टाकला विधानपरिषदेत पेन ड्राईव्ह बॉम्ब

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली होती. त्या पेन ड्राईव्हमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचं स्टिंग ऑपरेशन होतं. फडणवीसांनंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी देखील विधिमंडळात असाच पेन ड्राईव्ह डेटा जमा केला आहे.

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु असून यावेळी आज एकनाथ खडसे यांनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी खडसे यांनी विधिमंडळात एक पेन ड्राईव्ह डेटा जमा केला आहे. खान्देशमधून मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुलीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माफियांची रेकॉर्डिंगचा पेनड्राइव्ह ही अध्यक्षांना दिला. तसेच रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला डेटा असल्याचं खडसे म्हणाले आहेत.

‘रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पण आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे दिली होती, पण पोलिसांनी आरोपींना सहकार्य केलं,’ असं खडसे विधान परिषदेमध्ये म्हणाले.’आरोपींना तडिपारीच्या नोटीस दिल्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देत असतील तर पोलीस तपास कसा करणार? महिलेवर हल्ला होतो आणि त्याच आरोपींना संरक्षण दिले जाते, यापेक्षा दुर्दैवं कोणतं? महिलांविषयी वाईट बोलत आहेत हे गुंड, केलेली तक्रार दबाव आणून परत घ्यायला लावली,’ असं म्हणत खडसे यांनी या विषयाची व्हिडिओ आणि ऑडियो क्लिपचा पेन ड्राईव्ह सभागृहात दिला.

दरम्यान, खडसे यांच्या या आरोपांनंतर उत्तर देतांना मंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित पेन ड्राईव्ह आणि क्लिप सभागृहामार्फत द्यावा, योग्य ती कारवाई केली जाईल, असं शंभुराज सांगितले आहे. मात्र यावर खडसेंनी नाराजी व्यक्त करत आम्ही दिलेले पेन ड्राईव्ह खोटे होते, तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले एवढे पेन ड्राईव्हपण खोटे होते का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.