⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | विद्यापीठाकडून अवाजवी शुल्कवाढीबाबत घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्या!

विद्यापीठाकडून अवाजवी शुल्कवाढीबाबत घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । काही दिवसांपूर्वी विद्यापीठाकडून ४० ते ७३% टक्यांनी भरमसाट शुल्क वाढ करण्यात आली असून सदर अवाजवी शुल्कवाढीबाबत घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतिने कुलगुरू महेश्वरी यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, कुलगुरू महेश्वरी यांनी येत्या तीन दिवसांत या समस्ये वर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

विद्यापीठात जळगाव, धुळे व नंदुरबार क्षेत्रातील आदिवासी शेतकरी हातावर पोट भरणाऱ्या वर्गातून येणारा विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यापीठा मार्फत वाढवल्या जाणाऱ्या फी आणि ते ही इतक्या प्रमाणात वाढवला जाणारे शुल्क हे खूप जास्त आहे. समाजातील, तालुक्यातील, खेड्यातील, व शेवटचा घटकातील वर्गातील विद्यार्थीची आर्थिक समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना परवडेल असे असावे. तसेच फी वाढीचा घेतलेला निर्णय हा तात्काळ मागे घेण्यात यावा ही व फी वाढीचा निर्णय येत्या 15 दिवसात मागे न घेतल्यास पुढील 15 दिवसांच्या नतंर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतिने तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतिने कुलगुरू महेश्वरी यांना देण्यात आले. यावेळी मासू चे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन व पदाधिकारी पवन पाटील,सागर पाटील,प्रथमेश मराठे,गायत्री सपकाळे, आदिती केळकर आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह