वाणिज्य

भारतीय पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर किती खर्च करतात? रक्कम जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । देशभरात महागाईने कळस गाठला आहे. वाढत्या महागाईचा सर्वांनाच फटका बसत आहे. यात भारतीय पालकांसह मुलांना देखील महागाईचा फटका सहन करावा लागतोय. काही दिवसांपूर्वी एका मुलीने पीएम मोदींना पत्र लिहून सांगितले होते की, पेन्सिल-रबरसारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तिचे पालकही धडपडत आहेत. त्याच वेळी, आता इकॉनॉमिक टाईम्सचे एक संशोधन आले आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, भारतीय पालक भारतात मुलांच्या महाविद्यालयीन जीवनापर्यंत संगोपन करण्यासाठी किती खर्च करतात? या संशोधनात केवळ खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांची माहिती गोळा करण्यात आली आहे.

8 वर्षात फी 10 ते 12 टक्क्यांनी वाढली :
महागाईचा फटका खासगी शिक्षणाला बसत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. 10 वर्षांच्या जुन्या महागाई मॉडेलनुसार म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांकात 4.5 टक्के वाढ झाली आहे. मात्र, महागाईचे जुने मॉडेल असल्याने त्याचे समर्थन करता येणार नाही. एका अंदाजानुसार, 2012 ते 2020 दरम्यान, भारतात खाजगी शिक्षणाचा खर्च सुमारे 10-12 टक्क्यांनी वाढला आहे. शाळेत केवळ शैक्षणिक शुल्कच वाढले नाही, तर वाहतूक आणि परीक्षा शुल्कातही वाढ झाली आहे. तर पाहिले तर लोकांच्या उत्पन्नात एवढी वाढ दिसली नाही.

प्रवेश फी रु 25,000 ते 75,000
संशोधनानुसार, खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठीही मुलाला पैसे खर्च करावे लागतात. टियर-1 शहरातील बहुतेक शाळा 25,000 ते 75,000 रुपये प्रवेश शुल्क आकारतात. जर पालकांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला किंवा मुलीलाही त्याच शाळेत प्रवेश दिला तर काही शाळा त्यांना 10000 ते 20000 पर्यंत सूट देतात. शाळेच्या ब्रँडनुसार टियर-I आणि II शहरांमधील नर्सरी आणि किंडरगार्टनसाठी सरासरी ट्यूशन फी रु. 60000 ते रु. 1.5 लाख आहे.

डे केअरमध्ये वर्षाला २ लाख रुपये
काम करणारे पालक. ते मुलांना डे केअर सेंटरमध्ये दाखल करून घेतात. संशोधनानुसार, मेट्रो शहरांमधील काही डे केअर सेंटर्स दररोज 5000 ते 8500 रुपये आकारत आहेत.

दहावी नंतरचा खर्च
प्राथमिक शाळेवर वर्षभराचा सुमारे १.२५ लाख ते १.७५ लाख इतका खर्च होत आहे. मध्यम शाळेतील सरासरी वर्षभराची फी सुमारे 1.6 लाख – 1.8 लाख रुपये आहे. हायस्कूलमधील वार्षिक खर्च सुमारे 1.8 – 2.2 लाख रुपयांपर्यंत असू शकतो. अशा प्रकारे शालेय शिक्षणाचा खर्च 24 लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

महाविद्यालयीन शिक्षण खर्च
महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्चही अधिक आहे. चार वर्षांच्या B.Tech किंवा तीन वर्षांच्या B.Sc प्रोग्रामची किंमत सुमारे 4 लाख ते 20 लाख रुपये आहे. प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे 30,000 ते 5 लाख रुपये कोचिंगसाठी खर्च केले जातात. चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशनल कोर्सची किंमत सुमारे 86000 रुपये आहे. ज्यामध्ये कोचिंग फी जोडण्यात आलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button