⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | तरुणाईला लाजवेल अशी आजींची खुद्दारी,सत्तरीच्या उंबरठ्यावर असूनही विक्री करतात नारळ पाणी !

तरुणाईला लाजवेल अशी आजींची खुद्दारी,सत्तरीच्या उंबरठ्यावर असूनही विक्री करतात नारळ पाणी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | चिन्मय जगताप | बेरोजगारी हा शब्द फारच लोकप्रिय झाला आहे. कारण तरुण बेरोजगार आहेत असं सहजरित्या आपल्या आजूबाजूच्या समाजात म्हटलं जात आहे. मात्र हिम्मत असली तर कोणीही बेरोजगार नसतो हे ठासून सांगणार एक मूर्तीमंत उदाहरण जळगाव शहरात पाहायला मिळत आहे. हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वयाच्या ६८ वर्षी घरात न बसता परिस्थितीवर मात करत ‘रजपूत आजी’ आज जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाच्या बाहेर नारळ पाणी विकत आहेत.

परिस्थिती चांगली नसेल तर चांगला विचार करून परिस्थिती बदलता येते असे आपण कित्येकदा वाचतो मात्र फक्त चांगला विचारच न करता तितकीच मेहनत घेत आज ६८ वर्षाच्या चिंधाबाई राजपूत परिस्थिती बदलत आहेत व आपल्या मुलाबाळांना आपल्या परीने मदत करत आहेत. स्वाभिमानी वृत्तीच्या असलेल्या राजपूत आजी 70 व्या वर्षात पदार्पण करणार असूनहि त्या घरात बसून खाणं पसंत करत नाहीत. तर मेहनत करून मेहनतीच खाणं पसंत करतात म्हणूनच त्या आज बहिणाबाई गार्डन बाहेर नारळ पाणी विकत आहेत.

गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी त्या नारळ पाणी विकत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांना या व्यवसायात यश येईल की नाही माहित नव्हतं मात्र काही ना काही काम करायचं या ध्येयाने त्यांनी नारळ पाणी विकायला सुरुवात केली. काही दिवस त्यांना नारळ पाणी विकण्यावेळी नारळ फोडताना वेळ लागला. नारळ कसा फ़ोडायचा हे त्यांना माहीत नव्हत. म्हणून हे शिकायला त्यांना वेळ लागला. मात्र त्या यात पारंगत झाल्या आणि आता ते गेल्या पंधरा वर्षापासून नारळ पाणी विकत आहेत.

सुरुवातीपासूनच या राजपूत आजी विविध खेड्यांमध्ये जाऊन शेत काम करत होत्या. मात्र हळूहळू ते काम मिळणे बंद झाले. अखेर त्यांनी नारळ पाणी विकण्याचा निर्णय घेतला. सकाळी सात वाजता त्या उठतात बाजारात जाऊन मोठ्या प्रमाणावर नारळ विकत घेतात आणि बहिणाबाई गार्डन बाहेर येऊन विकतात.’आपलं नशीब आपल्याच हातात असतं आपण मेहनत केली तर आपल्याला रोजगार आणि यश नक्कीच मिळणार’ हे ठासून सांगणार हे एक मूर्तीमंत उदाहरण जळगाव शहरातल्या बहिणाबाई गार्डन बाहेर रोज नारळ पाणी विकत आहे. हे उदाहरण म्हणजे त्या सर्व बेरोजगार तरुणांना उत्साहित करणार आहे. ज्यांना रोजगार मिळत नसल्यामुळे ते काही करू शकत नाहीत. सर्वांनी या आजींच उदाहरण घेणे गरजेचे आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह