जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२२ । झांबरे विद्यालयात रोटरी क्लब अंतर्गत ७७७ व्याख्यानमाला उपक्रम आयोजित करण्यात आला. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प निलेश झोपे यांनी गुंफले. प्रमुख वक्ते निलेश झोपे यांनी ‘संगणकाची तोंडओळख’ या विषयावर विद्यार्थ्याना संगणका विषयी मार्गदर्शन केले.
संगणक वापरणे ही आजच्या व पिढीची आधुनिक काळाची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांना संगणका विषयी अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन वक्ते निलेश झोपे यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब ७७७ चे प्रोजेक्ट चेअरमन सी.डी.पाटील यांनी रोटरी क्लब विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाला रोटरी क्लब समन्वयक रंगनाथ राठोड, शाळेच्या मुखयाध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक एन.बी.पालवे, इंट्रॅक्ट क्लब समन्वयक अतुल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले.