जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । दर्शनासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरटयांनी लांबवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजनी हरियाचंद्र सूर्यवंशी (वय ६४) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. धरणगाव शहरात मंगळवार दि. १६ ऑगस्ट रोजी रोजी मरीमाता मंदिर येथे यात्रोस्तवाचा कार्यक्रम सुरू आहे. या यात्रोत्सवा भाविकांची मोठी वर्दळ असते. मरीमातेच्या दर्शनासाठी महिलांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळेस धरणगावातील मातोश्री नगरातील रहिवासी निवृत्त शिक्षिका रजनी हरियाचंद्र सूर्यवंशी (वय ६४) हे सुद्धा यात्रेत सहभागी झाले होते.
दरम्यान, कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपये किमतीची २५ ग्राम सोन्याची मोहल माळ लांबवली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात रजनी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत. पोलीसांनी मंदीर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता एका महिलेच्या वेशात अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवितांना दिसून आले आहे. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली असून लवकरच चोरटा पोलीसांच्या जाळ्यात येण्याची शक्यता आहे.