⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | महाराष्ट्र | शिंदेंना बोल्ड करण्यासाठी उद्धव ठाकरेंची गुगली : व्हीप जारी

शिंदेंना बोल्ड करण्यासाठी उद्धव ठाकरेंची गुगली : व्हीप जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । शिंदे गटाला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजून एक गुगली टाकली आहे. शिवसेना कोणाची हवात सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे सुरू आहे. अशावेळी शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील शिवसेनेच्या 55 आमदारांना व्हीप जारी केला आहे.

तर झालं असं आहे की, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी केला आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये जे जे ठराव जे जे प्रस्ताव सभागृहासमोर आणले जातील अशा वेळी मतदान होऊ शकते. यासाठी विधानसभेतील कामकाज संपेपर्यंत सभागृहात शिवसेनेच्या आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले यांना प्रतोद नेमले आहे. तर ठाकरे गटाकडून सुनील प्रभू हे मुख्य प्रतोद आहेत.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई असे म्हणाले की, आम्ही शिवसेना आहोत. विधानसभेत लोकसभेत लोकप्रतिनिधींमध्ये आम्ही बहुमताला जाणतो. अशावेळी बहुमत आमच्याकडे आहे. जो निर्णय सर्वोच्च न्यायालयात आहे. निर्णय आम्हाला मान्य असेल. आम्ही आमची भक्कम बाजू मांडू. यामुळे आम्हीच शिवसेना असल्यामुळे आम्हाला कसलीही अडचण नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड विचित्र गोष्टी घडत असतानाच आता शिवसेनेमध्ये देखील विविध रंगला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय हे सर्वोच्च न्यायालय किंबहुना निर्णय निवडणूक आयोग देईल. यात शंका नाही. मात्र हा निर्णय लवकरच व्हायला हवा असे म्हटले जात आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह