जळगांव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असतांना ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबविण्यात येत असुन,मुक्ताईनगर मध्ये कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
१५ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर येथील एस. एम. महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित बक्षीस वितरण समारंभात राज्य स्तरीय पीक स्पर्धा २०२१-२२ मधील तालुका पातळीवर विजेत्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र व संन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. पीक स्पर्धेत सर्व प्रगतशील व अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची पीक उत्पादन स्पर्धा आयोजित केली. त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील भगवान सुरजी महाजन (पतोंडी), सदानंद लक्ष्मण चौधरी (चांगदेव), सुभाष नामदेव महाजन( नरवेल), अंजनाबाई लक्ष्मण पाटील (नायगाव), वैभव युवराज पाटील (बेलसवाडी), श्रीमती जया प्रवीण अग्रवाल (बेलखेडे), वेरेंद्र दादाराव पाटील (सुकळी) या शेतकऱ्यांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत भाग घेण्याचे आव्हाहन केले. कार्यक्रमास एस एम. कॉलेज चे प्राचार्य डॉ. आय डी पाटील व उप प्रचऱ्या प्रा. एल बी गायकवाड, खडसे महाविद्यालयाचे प्राचऱ्या डॉ. एच ए महाजन, नायब तहसीलदार निकेतन वाले व प्रदीप झांबरे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी उपस्थित होते.