जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे आमदार गुलाबराव यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांची प्रथमच जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. चोपडी कोंडव्हाय फाटा येथे प्रचंड आतषबाजी व जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे स्वागत झाले.
ना. गुलाबराव पाटील यांनी लागोपाठ तिसर्यांना मंत्रीपदाची तर दुसर्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आज शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी ते जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याचा दौरा अधिकृतपणे जाहीर होताच त्यांच्या अभूतपुर्व स्वागताचे नियोजन करण्यात आले. ना. गुलाबराव पाटील हे आज सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून निघाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडी कोंडव्हाय फाटा येथे त्यांची जळगाव जिल्ह्यात एंट्री झाली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि गगनभेदी घोषणांनी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या हजारो समर्थकांनी ना. गुलाबराव पाटील यांचा स्वागत केले.
या यात्रेच्या सुरवातील माजी सैनिकांचे वाहन असू ते तिरंगा झेंड्यासह सुशोभीत करण्यात आलेले आहे. यामागे ना. गुलाबराव पाटील यांचे वाहन, मागे पोलिसांची वाहने आणि यामागे सुमारे पाचशे चारचाकी वाहनांचा ताफा अमळनेर शहराकडे निघाला. हा ताफा तब्बल सात किलोमीटर इतका लांब आहे. दरम्यान, वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने बंदोबस्त ठेवून अचूक नियोजन केले आहे.