जळगाव लाईव्ह न्यूज । E – Activa in India । भारतात सर्वात जास्त चालणारी स्कुटर कोणती तर ती म्हणजे ऍक्टिवा. देशातील सर्व कुटुंबांमध्ये एक्टिवा वापरलीच जाते. सर्व सामान्य कुटुंबाला हि स्कुटर परवडते म्हणून हि स्कुटर संपूर्ण भारतात सर्वात जास्त विकली जाते किव्वा तीचा खप सर्वात जास्त आहे. आता हीच सर्वांची लाडकी ऍक्टिवा हि विजेवर चालणार आहे. ती कशी ? जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.
संपूर्ण भारतामध्ये पेट्रोल दरवाढ होत आहे. पेट्रोलच्या या वाढत्या भावामुळे नागरिक त्रस्त आहेत. यातच इतर वस्तूंचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे विज ही सर्वात स्वस्त असल्यामुळे नागरिक आपला कल इ व्हे-ईकलकडे (E- Vheical) वळवत आहेत. अशावेळी विविध कंपन्या भारतामध्ये आपल्या विविध इलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या कंपन्या आपली ई व्हेईकल मार्केटमध्ये आणत आहेत.
आता हॉन्डा या कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर लॉन्च करण्याची तयारी दाखवली आहे. 2023 मध्ये हॉन्डा कंपनी आपली पहिली स्कूटर भारतात लॉन्च करण्याच्या तयारी मध्ये आहे.ती स्कुटर म्हणजे सर्वांची लाडकी ऍक्टिवा आणि हीच ऍक्टिवा आता भारतात लाँच करण्याचा मानस हॉन्डा या कंपनीचा आहे. (Honda India)
हॉन्डा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया भारतामध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करत आहे. हॉन्डा मोटरसायकल इंडिया (Honda India) ही कंपनी हॉन्डा मोटरसायकल जापान यांच्या सोबत भारतामध्ये करार बद्ध होऊन काम करणार आहे. 2023 च्या सुरुवातीला हॉन्डा आपली पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल आणणार आहे. ती सुद्धा दुसरी कोणती नाही तर एक्टिवा
संपूर्ण भारतामध्ये स्कुटरच नाव घेताच सर्वांच्या मुखातून एकच शब्द बाहेर पडतो तो म्हणजे ऍक्टिवा. याच नावाचा फायदा घेत होंडा आपल्या ऍक्टिवाला इलेक्ट्रिक व्हेईकलचे रूप देत लोकांसमोर आणणार आहे. हॉन्डा एक्टिवा संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त विकली जाणारी स्कुटर असल्याने हीच खप होणार हे निश्चित आहे. (Honda India Activa)