स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त भुसावळ स्थानकावर “तिरंगा एक्सप्रेस”चे स्वागत
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । “स्वातंत्राचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर तिरंगा” अभियानाचा भाग म्हणुन भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी भुसावळ-इगतपुरी मेमू एक्सप्रेस ही रेल्वेगाडी “तिरंगा एक्सप्रेस” म्हणुन चालविणे बाबत नाशिक व जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागामार्फत आयोजन करण्यात आले होते. सदर “तिरंगा एक्सप्रेस” चे भुसावळ रेल्वे स्टेशन येथे खासदार क्षाताई खडसे यांनी आमदार संजय सावकारे व एडीआरएम रुखमैय्या मीना यांच्यासह तिरंगा झेंडा दाखवत स्वागत केले.
तसेच “भुसावळ – इगतपुरी मेमू एक्सप्रेस” ह्या “तिरंगा एक्सप्रेस” मध्ये प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक या प्रवाशांशी खासदार रक्षा खडसे यांनी संवाद साधून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देऊन तिरंगा ध्वज वितरीत केले.
यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह, आमदार संजय सावकारे, एडीआरएम रुखमैय्या मीना, अडकम पाठक, अनिरुद्ध कुलकर्णी, भुसावळ प्रांत रामसिंह सुलाने, तहसीलदार दिपक दिवरे, भुसावळ नगरपालिका मुख्य अधिकारी संदीप चिद्रवार, उपमुखधिकारी लोकेश ढाके, मंडळ अधिकारी एफ.एस.खान, तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष विनोद बारी, तलाठी पवन नवघडे, कर अधीक्षक परवेज अहमद, आस्थापना प्रमुख वैभव पवार तसेच भुसावळ नगरपालिका व रेल्वे कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.