⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | गिरीश महाजनांचे ते वक्तव्य धमकी समजायचं की,.. आता खडसेंचा निशाणा

गिरीश महाजनांचे ते वक्तव्य धमकी समजायचं की,.. आता खडसेंचा निशाणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) या दोंघांमधील वादाचा विषय नवीन नाहीय. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आज शुक्रवारी सकाळी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केली होती. तुमची तू तू मैं मैं बंद करा अशा शब्दात महाजन यांनी खडसेंना एकप्रकारे इशाराच दिला होता. आता यावर एकनाथ खडसे यांनी महाजनांवर निशाणा साधलाय. Eknath Khadse criticism of Girish Mahajan

गिरीश महाजनांनी माझ्याविषयी जे वक्तव्य केलं ते धमकी समजायचं की सल्ला समजायचा? मंत्री झाल्यावर अशा धमक्या येत असतात. विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न असतो. मी तुमचं काम करण्यास कोणती अडचण आणली नाही, अशा शब्दात खडसे यांनी महाजनांवर निशाणा साधलाय.

तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. त्यावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलंय. आता असं झालं आहे की पंकजाताईंची काळजी भाजपचे सर्वच नेते करायला लागले आहेत. गिरीश महाजनांपासून तर भाजपचे सर्वच नेते पंकजाताईंची काळजी घेत असून तिला सल्ला देत आहेत की तुला न्याय दिला जाईल. त्यामुळे तिच्या पाठीशी सर्वजण उभे असतील तर तिला न्याय मिळाला अशी अपेक्षा करतो, असा टोला खडसेंनी लगावलाय.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
नुकतेच शिंदे-फडणवीस सरकरच्या मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला. यानंतर पंकजा मुंडे यांनी मोठं व्यक्तव्य केलं होते. त्यांना वाटलं असेल की यांची मंत्रिपदासाठी पात्रता नाही, म्हणून दिलं नसेल. पण जेव्हा त्यांना वाटेल की पंकजा मुंडेंची पात्रता आहे तेव्हा ते देतील. असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.