⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | वाणिज्य | रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी झाली स्वस्त ; पहा आजचे नवीन दर

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने-चांदी झाली स्वस्त ; पहा आजचे नवीन दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ जर तुम्ही सोने (Gold Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आज गुरुवारी सोन्या-चांदीच्या (Silver Rate) दरात मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील घसरलेल्या किमतीचा परिणाम आज भारतीय वायदे बाजारावरही दिसून आला. आज सोने दरात घसरण झाली असली तरीही सोन्याचा भाव ५२ हजारांच्या वरच आहे. Gold Silver Rate Today

काय आहे आजचा सोन्याचा दर?
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव १७५ रुपयांनी घसरून ५२,०६६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तत्पूर्वी, सोन्याचा व्यवहार ५२,१४४ रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणीतील नरमाईमुळे लवकरच भाव खाली आले. तसेच दुसरीकडे MCX वर, चांदीची किंमत ४३४ रुपयांनी घसरून ५८,५२६ रुपये प्रति किलोवर अली आहे. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार ५८,४३७ रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे (मेकिंग चार्जेसमुळे) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

महाराष्ट्रातील दर?

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,६५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,३८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,६९० रुपये आहे. जळगावमध्ये सोने ५२,५०० रुपये प्रति तोळा इतका आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५८७ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

जागतिक बाजारपेठेत काय चालू आहे?
जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव दिसून येत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट किंमत $1,784.97 प्रति औंस होती, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.38 टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत देखील आज घसरून $ 20.45 प्रति औंस झाली. मागील बंद किंमतीपेक्षा हे 0.69 टक्के कमी आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.