जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या खटल्याचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. राज्यात लवकरच नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पत्रकारांना दिली.
राज्यात शिंदे फडणवीस यांची सत्ता आली असून महिना ओलांडला आहे. अजून देखील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाहीये. मात्र आता कधी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नये असे सांगितलेले नाही. सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नसून, तुमच्या विचाराआधी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीस म्हणाले की, जेव्हा माहिती असताना देखील राजकारणाकरीता डॉयलॉगबाजी करण्यात येते. याआधीच्या सरकारमध्ये देखील सचिवांना ते अधिकार होते. याआधी आमच्या सरकारमध्ये देखील अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. अर्धन्यायिक प्रकरणे वगळता मंत्रिस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत असे देखील फडणवीस म्हणाले.