जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जळगाव तालुका संघटनेचा माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवन येथे खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिक्षण प्रशिक्षण संस्था जळगाव चे प्राचार्य अनिल झोपे हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर मतदार संघाचे कार्यकुशल आमदार सुधीर तांबे, गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण साहेब,प्रशासनाधिकारी दिपाली पाटील मॅडम,स्वामी समर्थ ग्रुप चे अध्यक्ष मनोज पाटील सर,जेष्ठ समाजसेविका सिंधुताई तायडे,महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अशोकजी मदाने,जिल्हाध्यक्ष अजित चौधरी,सचिव जीवन महाजन कोषाध्यक्ष राकेश पाटील,कैलास तायडे,श्याम ठाकरे,देवेंद्र चौधरी,सुनिल पवार,गोविंदा लोखंडे,गणेश लोडते,चंद्रकांत पाटील,पद्माकर चोधरी,ग.स सोसायटीचे अनिल पाटील,अजय सोमवंशी,खाजगी पतसंस्थेचे प्रसन्न बोरोले, रविंद्र पाटील,सरलाताई पाटील,संतोष मराठे सर्व संघटनेचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे जळगाव तालुका अध्यक्ष निलेश मोरे यांनी केले सूत्र संचालन सचिव राहुल चौधरी व लीना चौधरी यांनी केले,प्रकल्प प्रमुख निखिल जोगी यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी केतन बऱ्हाटे,प्रतिक्षा पाटील,सुषमा गायकवाड,हर्षाली पाटील,कल्पना सोनावणे,सोमनाथ लोखंडे,जाकीर हुसेन शेख ,कैलास थोरवे,विनोदकुमार शेलवडकर,सागर झांबरे,सागर पाटील,जुबेर अहमद शेख ,सैयद जाकीर अली,लिनेश खडके, सुनिल नारखेडे यांनी प्रयत्न केले.