⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

शिंदे गटाचा जळगाव जिल्ह्यात फुटला नाही भोपळा

जळगाव लाईव्ह न्यूज | ग्रामपंचायत निवडणूक | संपूर्ण महाराष्ट्रात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर शिंदे गटाला ठाकरे गटापेक्षा मोठे यश आले मात्र जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाला भोपळाही फोडता आला नाही.

चार तालुक्यात झालेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला एकाही ग्रामपंचायतीमध्ये यश आले नाही.जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाला एकाही ठिकाणी खाते उघडता आले नाही.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल , रावेर अमळनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर झाले. मात्र एकाही ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाला यश आले नाही.

जळगाव जिल्ह्यातील ग्रापंचायत निवडणुकीचे निकाल

भाजप- ०६

शिवसेना-०५

राष्ट्रवादी- ०५

काँग्रेस-०५

शिंदे गट- ००

इतर- ०३

जळगाव जिल्ह्यामध्ये चार तालुक्यांमध्ये 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीमध्ये भाजपा ६ ठिकाणी विजयी ठरली तर राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांना प्रत्येकी ५ ठिकाणी आपला विजय मिळवता आला. तर ३ ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली.एकही गटात कोणत्याही पॅनलने पुढे येत आम्ही शिंदे गटाचे समर्थक असल्याचे विजयी किंवा पराभूत झाल्यावर सांगितले नाही.