⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | महाराष्ट्र | बहीण – भावाचं नातं अजून घट्ट करण्यासाठी पोस्टाने आणली ‘हि’ योजना

बहीण – भावाचं नातं अजून घट्ट करण्यासाठी पोस्टाने आणली ‘हि’ योजना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । बहीण-भावाच्या प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणारा सण राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षा बंधन अगदी जवळ आला आहे. अश्यावेळी पोस्ट ऑफिस देखील सज्ज झालं आहे. बहिणी आपल्या भावाला राख्या पोस्टाने पाठवत असतात. अश्यावेळी राखी भिजू नये म्हणून पोस्टाच्या वतीने खास पाकिटे तयार करण्यात आली आहेत. हि पाकिटे वॉटरप्रूफ आहेत.

नात्याचा गोडवा अधिक वाढविण्यासाठी पोस्टाने देखील पुढाकार घेतला आहे. आपल्या भावाला राखी पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बहिणींनी गर्दी केली आहे. पावसात ही राखी भिजू नये म्हणून पोस्टाच्या वतीने खास वॉटरप्रूफ पाकिटे तयार करण्यात आलेली आहे. बाजारात देखील यावेळी विविध आकर्षक राख्या उपलब्ध झाल्या आहेत.

बहिणी घरापासून लांब राहणाऱ्या भावांना पोस्टानेच राख्या पाठवतात. या कामासाठी टपाल विभागाची मदत घेऊ घेता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खास राखी पाकिटांची विक्री सुरू झाली आहे. राखी लिफाफा पूर्णपणे जलरोधक आणि सुगंधी आहे. या लिफाफ्याच्या विक्रीसाठी विभागातर्फे विभागातील तीनही प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये स्वतंत्र काउंटर करण्यात आले आहेत. लिफाफ्याची किंमत १० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह