जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अचानक बिघडली. यामुळे त्यांच्या आजच्या सर्वच प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर केले आहेत. यामुळे हि एक मोठी राजकीय घडामोड म्हटली जात आहे. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीनंतर उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने सातत्याने विरोधकांकडून टिका होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस आज पुन्हा दिल्लीला निघाले आहेत.
महाराष्ट्र्रात शिंदे-भाजपचे (Shinde – BJP) सरकार स्थापनला महिना उलटून गेला. तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीय. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात. अशातच मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 5 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार संध्याकाळी राजभवनात होणार आहे. दरम्यान, 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आलीय. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे.
खरे तर सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यास शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अनेकवेळा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला तयार केला आहे. दरम्यान, सध्या 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली असून त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसेंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
शिंदे गटातील कुणाची लॉटरी लागणार?
गुलाबराव पाटील
उदय सामंत
अब्दुल सत्तार
दादा भुसे
शंभुराज देसाई
भाजपकडून कुणाला संधी मिळणार?
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
चंद्रशेखर बावनकुळे
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
प्रवीण दरेकर