⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यपाल कोशारी यांचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यपाल कोशारी यांचा निषेध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराट्रातील नागरिकांचा अपमान झाला असल्याने विविध ठिकाणी याचा निषेध करण्यात येत आहेत. आज जळगावात देखील राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला. तसेच महाराष्ट्रात नविन राज्यपालांची नियुक्ती करण्यात यावी अशी जाहीर मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतुन राजस्थानी व गुजराती लोक जर बाहेर पडले तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही. असे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी एका कार्यक्रमात जाहीर पणे केले. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे मन दुखावले आहे व महाराष्ट्राचा व महाराष्ट्रीयन नागरिकांचा अपमान झालेला आहे. यापूर्वी देखील कोशारिंनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांविषयी व ईतरही बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात अशांतता निर्माण झाली होती. राज्यपाल या अत्यंत जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने सातत्याने असे वादग्रस्त समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे अत्यंत निंदनीय व खेदजनक आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगर तर्फे आकाशवाणी चौक येथे महामार्गावर रस्ता अडवून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करत तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रात नविन राज्यपालांची नियुक्ती करण्यात यावी अशी जाहिर मागणी करण्यात आली.

सदर आंदोलनात महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, राजू मोरे, रिकू चौधरी, अमोल कोल्हे, सुशील शिंदे, अशोक सोनवणे, उज्वल पाटिल, भगवान सोनवणे, रमेश बहारे, दत्तात्रय सोनवणे, रहीम तडवी, विशाल देशमुख, इब्राहिम तडवी, किरण राजपूत, अनिल पवार, संजय जाधव, राहुल टोके, किरण चव्हाण, सूर्यकांत भामरे, हितेश जावळे, भला तडवी, भिमराव सोनवणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह