जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील वाढीमुळे शुक्रवारी सकाळी चांदीच्या भावात ५०० रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली. त्यामुळे चांदीची किंमत ५८ हजारांच्या पुढे गेली. तर दुसरीकडे सोन्याच्या भावात किंचत वाढ झाली आहे. आज सोने ५० रुपयांनी महागले आहे. मात्र, या आठवड्यात सोने जवळपास १२०० रुपयांनी वधारले आहे. Gold Silver Price Today
मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत ५० रुपयांनी वाढून ५१,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. याआधी सोन्याचा व्यवहार ५१,४९० रुपयांवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणीतील मंदी पाहता लवकरच भाव थोडे खाली आले. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.19 टक्क्यांनी वाढले आहे.
चांदीमध्ये जोरदार उडी
तर दुसरीकडे आज एमसीएक्सवर सकाळी चांदीचा भाव ४१८ रुपयांनी वाढून ५८,०३७ रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 57,830 रुपयांवर सुरू झाला होता, परंतु मागणी वाढल्याने किमतीत तेजी दिसून आली. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.73 टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.
जागतिक बाजारात किंमत काय?
आज जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. यूएस मार्केटमध्ये आज सोन्याची स्पॉट किंमत 1,762.02 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.36 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, चांदीची स्पॉट किंमत आज 20.08 डॉलर प्रति औंस आहे, जी मागील बंद किंमतीपेक्षा 0.62 टक्के जास्त आहे. यामुळेच आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे.