⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | वाणिज्य | सर्व बँक खातेदारांनो या नव्या नियमाचा बसू शकतो फटका; आताच जाणून घ्या

सर्व बँक खातेदारांनो या नव्या नियमाचा बसू शकतो फटका; आताच जाणून घ्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । सर्व बँक (Bank) खातेदारांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी केल्यानंतर सर्व बँकांच्या कामाची पद्धत बदलेल. नवीन नियम लागू झाल्याने बँक कर्मचाऱ्यांसह बँकेच्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. होय, आरबीआयने असे म्हटले आहे की बँका आणि इतर वित्तीय संस्था त्यांच्या शाखांमधील कागदाचा वापर पूर्णपणे काढून टाकण्याबरोबरच एटीएममध्ये एटीएमची ई-पावती देण्याचा विचार करू शकतात. RBI New Rule All Bank Branches in Paperless

सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार होणार
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी (२७ जुलै) ही सूचना दिली. रिझव्‍‌र्ह बँकेने ‘क्लायमेट रिस्क अँड सस्टेनेबल फायनान्स’ या विषयावरील चर्चापत्रात म्हटले आहे की, हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींवर आधारित धोरण तयार करायचे आहे. यासाठी केंद्रीय बँक जागतिक संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय मंचांच्या अनुभवाचा फायदा घेत आहे. या क्रमाने, सर्व रिझव्‍‌र्ह बँक विनियमित घटकांसाठी (RE) सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील.

शाखांना हिरव्या शाखांमध्ये रूपांतरित करण्याचा विचार
हवामान बदलाच्या जोखमीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी रणनीती तयार केली जाईल, असे चर्चापत्रात सांगण्यात आले. “आरई बँकिंग प्रक्रियांना अधिक पर्यावरणपूरक बनवून त्यांच्या कामकाजात कागदाचा वापर काढून टाकून त्यांच्या शाखांचे ग्रीन शाखांमध्ये रूपांतर करण्याचा विचार करू शकते,” असे त्यात म्हटले आहे. मात्र, हा बदल करणे बँकांना सोपे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वाधिक समस्या ग्रामीण भागातील शाखेत येणार आहे.

आरबीआयने ३० सप्टेंबरपर्यंत चर्चापत्रावरील टिप्पण्या मागवल्या आहेत. त्यानुसार, REs ई-पावत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्ग आणि माध्यमांचा विचार करू शकतात. इंडियन बँक्स असोसिएशन (RBA) शाश्वत वित्त क्षेत्रात हवामानातील जोखीम आणि क्षमता निर्माण करण्यावर एक कार्य गट स्थापन करू शकते, असेही सुचवण्यात आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.