जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । ओव्हरटेक करताना चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याचे झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २७ रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत कैलास पाटील यांच्या धुळे-अमळनेर रस्त्यावरील स्वादिष्ट नमकीनजवळ २५ रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास, ओव्हरटेक करताना चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील साडेचार वर्षांच्या बालकाच्या पाय तुटला होता. तर दुचाकीचालक चालक कैलास नंदलाल पाटील यांच्या पायाला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर धुळे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान २६ रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मृत कैलास पाटील यांच्या पश्यात पत्नी, २ मुले, आई, वडील असा परिवार आहे. जानवे येथे २७ रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.