⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | महाराष्ट्र | सुप्रिम कोर्टाचा शिवसेनेला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाबाबतची ती याचिका स्वीकारली

सुप्रिम कोर्टाचा शिवसेनेला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाबाबतची ती याचिका स्वीकारली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामुळे शिवसेनेला (Shiv Sena) मोठा दिलासा मिळाला आहे. ती म्हणजे शिवसेनेने निवडणुक आयोगाबाबत कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. ती याचिका आता कोर्टाने स्विकारली आहे. त्यामुळे या याचिकेवर सुप्रिम कोर्ट काय निर्णय देणार त्यावरच निवडणुक आयोगाच्या (Election Commission) सुनावणीचे भवितव्य अवलंबून आहे.

शिंदे गटाच्या बंडखोरीने शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. शिवसेना कोणाची? यावरुन कोर्टात प्रकरण सुरु असतानाच केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला 9 ऑगस्टपर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. पण शिवसेनेने निवडणुक आयोगाबाबत सुप्रिम कोर्टामध्ये याचिका दाखल केली.

मात्र, कोर्टात सुनावणी सुरु असताना निवडणुक आयोगाचा हस्तक्षेप कशाला असा सूर शिवसेनेमध्ये होता. त्याच अनुशंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तर केंद्रीय यंत्रणा कशा काम करतात याचे दाखले खा. संजय राऊत यांनी दिले होते. त्यामुळे शिवसेनेने जी याचिका कार्टात दाखल केली होती त्याला स्विकारण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.